Post Office Saving Account Full Information in Marathi

आज आपण पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट बद्दल बोलणार आहोत. आजकाल प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी काही पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत. अशा स्थितीमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते हा एक चांगला पर्याय आहे. ज्यात तुम्ही दरमहा काही पैसे जमा करून चांगली रक्कम वाचवू शकता. आणि तुमचे स्वप्न किंवा भविष्यातील कार्य पूर्ण करू शकता. तसे, पोस्ट ऑफिसमध्ये बचत करण्यासाठी अनेक योजना आहेत. ज्यामध्ये Post Office Saving Account हा देखील एक चांगला पर्याय आहे.

सध्या तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारची खाती उघडू शकता जसे की Post Office Savings Account, Recurring Deposit Account, Time Deposit Account, Monthly Income Account, Public Provident Fund Account, Sukanya Samriddhi Account, National Savings Certificates, Kisan Vikas Patra. आता येथे आपण पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याच्या संपूर्ण माहितीबद्दल बोलू.


Post Office Saving Account Full Information in Marathi

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट उघडण्याचे काही फायदे देखील आहेत. जे की तुम्हाला इतर कोणत्याही बँकेत बचत खाते उघडून मिळत नाही. उदाहरणार्थ, पोस्ट ऑफिसमधील बचत खाते फक्त ५०० रुपये मध्ये उघडले जाते. परंतु इतर बँकेत बचत खाते (१००० रुपये गाव - ३०००-१०००० रुपये मेट्रो सिटी) या दराने उघडले जाते. या व्यतिरिक्त, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे व्याज दर देखील इतर बँकांपेक्षा जास्त आहे. सध्या, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४% प्रमाणे व्याज दर आहे.

Post Office Saving Account Full Information in Marathi
Post Office Saving Account Full Information in Marathi

How to Open Post Office Saving Account

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट: पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. की तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म मिळेल. ते तुम्हाला भरून द्यावा लागेल आहे. 

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे  

 • आधार कार्ड एक फोटो कॉपी 
 • पॅन कार्डची एक फोटो कॉपी 
 • दोन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक आहेत.

फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिस ऑफिसर कडे फॉर्म सबमिट करावा लागेल. फॉर्म सबमिट करताना तुमचे मूळ आधार आणि पॅन तपासले जातात. माहिती तपासल्यानंतर तुम्हाला मनी डिपॉझिट स्लिप भरावी लागेल. ज्यात तुम्ही कमीत कमी 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता. स्लिप आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला पासबुक दिले जाते. ज्यात तुम्ही तुमच्या ठेवी आणि पैसे काढण्याची माहिती पाहू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते एका दिवसात उघडले जाते.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi 2021


Benefits of Post Office Saving Account

 • खाते उघडण्यासाठी फक्त ५०० रुपये रक्कम लागतात.
 • वैयक्तिक/संयुक्त खात्यांवर वार्षिक 4.0% प्रमाणे व्याजदर भेटतो .
 • पोस्ट ऑफिस बचत खात्यात चेक व एटीएम सुविधा उपलब्ध आहेत.
 • खाते उघडताना चेक सुविधा घेतली नसेल तरी चालेल कारण तुम्ही चेकची सुविधा नंतर देखील मिळू शकते.
 • २०१२-१३  या आर्थिक वर्षापासून 10,000/- पर्यंत मिळणारे व्याज करमुक्त आहे.
 • खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते.


Post Office Saving Account ATM Card

इतर बँके प्रमाणेच आता एटीएम कार्डची सुविधा पोस्ट ऑफिस बचत खात्यातही उपलब्ध आहे. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. परंतु पोस्ट ऑफिस बचत खात्यात तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 महिन्यांनंतरच एटीएम कार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घरच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन एक फॉर्म भरून सबमिट करावे लागेल. फॉर्म भरताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करणे आवश्यक आहे. एकदा तुमचे एटीएम अक्टिव्हेट झाले की त्यांनतर, तुम्ही कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता.

Post Office Saving Account ATM Card Limits

 1. दररोज एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा २५००० /- रुपये इतकी आहे 
 2. पोस्ट ऑफिसमध्ये रोख व्यवहारची मर्यादा. १०००० /- रुपये इतकी आहे 
 3. इतर बँकेच्या एटीएममध्ये मोफत व्यवहारसाठी दरमहा मेट्रो सिटी मध्ये 3 मोफत व्यवहार करायला भेटतो (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही)
 4. नॉन मेट्रो शहरमध्ये  5 विनामूल्य व्यवहार करायला भेटते (आर्थिक आणि गैर आर्थिक दोन्ही)
 5. इतर बँकेच्या एटीएममध्ये मोफत व्यवहार केल्यानंतर प्रति व्यवहार २०/- रुपये + GST शुल्क आकारते


Facilities in Intra Operational Net Banking

पोस्ट ऑफिस आता पूर्वीसारखे राहिले नाही आहे. ते आता इतर कोणत्याही बँकेपेक्षा कमी नाहीत. आधीच सांगितल्या प्रमाणे ते आपल्याला एटीएम कार्डची सुविधा देतात. इतकेच नाही तर ह्या व्यतिरिक्त, ते त्यांच्या खातेदाराला इंटरनेट बँकिंग सुविधा देखील देत आहेत. ज्याद्वारे तुम्ही घरी बसून तुमचे पोस्ट ऑफिस खाते अगदी सहजपणे वापरू शकता. पोस्ट ऑफिसला न जाता. तुमच्या खात्यात इंटरनेट बँकिंग सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या होम पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल. तीथे तुम्हाला इंटरनेट बँकिंगचा फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. तुमचे इंटरनेट बँकिंग 48 तासांमध्ये सक्रिय होईल.

त्यानंतर तुम्हाला https://ebanking.indiapost.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. त्यावर तुम्हाला New User Activation वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा कस्टमर आयडी आणि अकाउंट आयडी टाकावा लागेल. जे तुमच्या पोस्ट ऑफिस पासबुकमध्ये असेल. त्यानंतर तुमच्या रेजिस्टरड मोबाईल नंबर आणि ईमेलवर एक OTP येईल. ओटीपी टाकल्या नंतर. तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता.

Benefits of Post Office Saving Account Net Banking

 • नेट बँकिंग ने सर्व लिंक असलेल्या खात्यांचे व्यवहार पाहू शकता.
 • तुम्ही नेट बँकिंग द्वारा तपशील पाहू/प्रिंट करू शकतो.
 • पोस्ट ऑफिस बचत खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करू शकतो.
 • लिंक केलेल्या RD खात्यांमध्ये नेट बँकिंग द्वारा पैसे जमा करता येते.
 • नेट बँकिंग द्वारा लिंक केलेल्या SSA खात्यात पैसे जमा करता येते.
 • तसेच नेट बँकिंग द्वारा तुम्ही लिंक केलेल्या PPF खात्यात पैसे जमा करू शकता.
 • TD खाते उघडू शकता.
 • आरडी खाते देखील उघडू शकता .
 • जर कोणते पेमेंट थांबले असेल तर तपासू शकता.


Who can open Post Office Saving Account:-

 1. एकच प्रौढ
 2. फक्त दोन प्रौढ (संयुक्त A किंवा संयुक्त B)
 3. अल्पवयीनच्या वतीने एक पालक
 4. अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने एक पालक
 5. 10 वर्षांवरील एक अल्पवयीन त्याच्या नावावर


Deposit and Withdrawal in Post Office Saving Account:-

सर्व डिपॉझिट/ पैसे काढणे संपूर्ण रुपयामध्ये असेल.

 1. कमीत कमी ५०० रुपये डिपॉझिट असावी (त्यानंतर डिपॉझिट 10 रुपयांपेक्षा कमी नाही)
 2. कमीत कमी ५० रुपये काढू शकता
 3. डिपॉझिट साठी कमाल मर्यादा नाही
 4. ५०० रुपये पेक्षा कमी अकाउंटला पैसे राहतील अशा विथड्रॉवला परवानगी दिली जाणार नाही
 5. जर आर्थिक वर्षाच्या अखेरीस खाते मध्ये ५०० रुपये शिल्लक नसतील तर देखभाल शुल्क म्हणून 100 वजा केले जातील आणि जर खाते शिल्लक शून्य झाले तर खाते आपोआप बंद होईल


Interest in Post Office Saving Account:-

 1. महिन्याच्या १० तारखेला आणि महिन्याच्या अखेरीस किमान शिल्लक आधारावर व्याजाची गणना केली जाईल आणि केवळ संपूर्ण रुपयामध्ये परवानगी दिली जाईल
 2. महिन्याच्या १० तारखेला आणि शेवटच्या दिवसामधील शिल्लक ५०० रुपायाच्या खाली आल्यास महिन्यात कोणत्याही व्याजास परवानगी दिली जाणार नाही. 
 3. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात व्याज अर्थ मंत्रालयाने निर्धारित केलेल्या व्याज दराने जमा केले जाईल
 4. खाते बंद होण्याच्या वेळी, ज्या महिन्यात खाते बंद आहे त्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज दिले जाईल
 5. आयकर कायद्याच्या 80 टीटीए अंतर्गत, सर्व बचत बँक खात्यांमधून १०,००० रुपया पर्यंत व्याज. आर्थिक वर्षात कमावलेल्या करपात्र उत्पन्नातून सूट दिली जाते


Post a Comment

0 Comments